पावसाळ्या पूर्वी शासनाने केली सहा कोटी मध्ये रस्त्यांचे प्याच डांबरीकरण – मुंबई-गोवा महामार्ग

रत्नागिरी, ता. २6 महाराष्ट्रतिल् सर्व महामार्ग पूर्ण होत आहेत पण अपवाद फक्त मुंबई गोवा महामर्गाचा आहे. कोकणाने राज्याला अनेक नेतृत्व दिली परंतु एक ही नेतृत्व कोकणाच्या महामार्गाचा वनवास संपवू शकले नाही.निष्क्रिया प्रशासन मुजोर कंत्राटदार यामुळे हे काम राखडले आहे.  पळसपे ते कसू आणी कसू ते इंदापूर या भागात भागात भू संपादन आणी वन जमनी आशा आनेक अडचणी उदभवल्या आहेत. हा महामार्ग बारा वर्ष राखडला हेच कोकण वासियांचे दुर्भाग्य आहे.

पावसाळ्या पूर्वी शासनाने केली सहा कोटी मध्ये रस्त्यांचे प्याच डांबरीकरण – मुंबई-गोवा महामार्गचौपदरीकरणाच्या कामातील अडथळे यांचा विचार करता. पावसाळ्यापूर्वी आरवली ते वाकेडदरम्यान जुन्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. सुमारे ९० किलोमीटरच्या टप्प्यात सुमारे ४५ किलोमीटर रस्ता डांबरी झाला असून नादुरुस्त रस्त्यांचे पॅच डांबरी करण्यात आले आहेत त्यावर सहा कोटी रुपये खर्च करण्यात आला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे काँक्रिटीकरण पूर्ण झालेला आणि डांबरी दोन्हीही रस्त्यांचे भाग गणेशोत्सवामध्ये वाहतुकीस तयार ठेवण्यात आले आहेत.

नवीन ठेकेदाराची नियुक्ती केल्यानंतर आरवली ते वाकेड रस्त्याच्या चौपदरीकरणाला मोठ्याप्रमाणात गती मिळाली. अवघड अशा निवळी घाटामध्ये प्रमुख भागातील काँक्रिटीकरणही करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी वारंवार बैठका घेत आढावा घेतला आहे. कामामध्ये ठेकेदारांना येणार्‍या अडचणी सोडवण्यावर भर दिला आहे. चौपदरीकरणाच्या कामामुळे या ९० किलोमीटरच्या टप्प्यातील रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झाला होता. यावरून वाहने चालवताना अडचणी निर्माण होत होत्या. यावर तात्पुरता पर्याय म्हणून खराब झालेल्या डांबरी रस्त्याचे पॅच पुन्हा दुरुस्त करण्यावर भर दिला आहे. लांजा, पालीसह निवळीमध्ये वाहतूक सुरळीतपणे चालवता येत आहेत.

या टप्प्यातील ५० टक्के काँक्रिटीकरण पूर्ण झाले. पूर्वी वाहने चालवताना अनेक अडचणी येत होत्या. गणेशोत्सवामध्ये महामार्गाची एकलेन वाहतुकीस खुली करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानुसार कामाचा वेग वाढवला जात आहे. काही पुलांची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. पाऊस लांबल्यामुळे काँक्रिटीकरण पूर्ण झालेले रस्ते जुन्या रस्त्यांशी जोडता येत आहेत. आरवली ते वाकेडदरम्यान वाहने चालवताना वाहनचालकांना अडचण येणार नाही याची काळजी बांधकाम विभागाकडून घेण्यात आली आहे.

हे पण वाचा:

मीरा भाईंदर महानगर पालिका भरती

ISRO VSSC भर्ती 2023

Indian Airforce Agniveer Bharti

DRDO जॉब 

ZP Raigad Bharti 2023

2 thoughts on “पावसाळ्या पूर्वी शासनाने केली सहा कोटी मध्ये रस्त्यांचे प्याच डांबरीकरण – मुंबई-गोवा महामार्ग”

Leave a Comment